भारती सिंग drugs प्रकरणात अडकली | Comedian Bharti Singh Arrested by Narcotics Control Bureau

2021-08-24 0

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती सिंगच्या घरी छापा टाकला. या छाप्यात तिच्या घरी गांजा मिळाला. यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना समन्स बजावून चौकशीसाठी कार्यालयात नेले. चौकशी दरम्यान भारतीने अमली पदार्थ घेत असल्याची कबुली दिली. एवढच नाही तर तिचा नवरा हर्ष यानेही गांजा सेवन करत असल्याचं मान्य केलं.आता या प्रकरणी भारतीला एनसीबीने अटक केली.
एनसीबीने भारतीच्या अटकेची खबर पक्की असल्याचं एका स्टेटमेंट मध्ये त्याची पुष्टी केलीये. भारती सिंगचं प्रॉडक्शन ऑफिस आणि घरावर एनसीबीने छापा टाकला होता, असंही सांगण्यात येतंय. छाप्यात त्यांनी ८६.५ ग्रॅम गांजा जप्त केला. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज पेडररने दिलेल्या माहितीच्या आधारे अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील भारतीच्या घराची झडती घेतली. आता हा प्रश्न आहे की भारती पर्यंत NCBच पथक कसं पोहचले.. तर एनसीबीने अनेक ठिकाणी छापा टाकत ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेतलं. यातील एका पेडलरने भारतीचं नाव सांगितलं.  यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी दरम्यान एजन्सीने लॅपटॉप, मोबाइल फोन आणि टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती.
#Bhartisingh #Drugscandal #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber